Sunday, 19 May 2013

शुक्राची चांदणी

रात्रीच्या सुरवातीला ,झोपेच्या पायथ्याशी ,
बाबां सोबत बसून होतो , अंगाशी !

रात्रीचा राजा दिसत नव्हता आकाशात ,
झाडाच्या सानिध्यात माझे नशीब .

दूर  कुठे दिसणारे ते लुकलुकते चांदण ,
  बघून वेडे शब्द उगाच निघणार ,
 कि राजा  आणि प्रजा सोडून दिसणार ते पाखरू कोण ?
एकठ आपल्यातच रमणार ते लेकरू  कोण ?

प्रश्न ते माझे, विचार निराळे,
बाबांचे मन ऐकते मन थाळे .

 एकट्याला गर्व आहे   दिसण्याचा ,
सर्वाहून वेगळा , निराळा असण्याचा .

असतो तो आपुल्या गच्चीवर ,
त्याला गर्व आहे , घरात न राहण्याचा .

 काही चांदण कुरूप आहे ,काही फार दूर आहे,
त्याला गर्व आहे  जवळ असण्याचा .

पाहिलं पाऊल टाकण्याचा आणि राज्याला राजा म्हणून पहिले म्हणण्याचा,
त्याला गर्व आहे रात्री पाहिलं येणाचा.
राज्या सोबत शेवट बघण्याचा त्याला गर्व आहे.

राज्याला पण गर्व आहे ,त्याच्या सोबतीची ,
न मागता दिलेल्या मैत्रीची ,न चुकता रोज भेटण्याची . . । शुक्राची चांदणी 

4 comments: