Sunday, 11 November 2012

आयुष्याची गणिते

कुठून चुकली बेरीज माझी ,
कुठून चुकली वजा ,
आयुष्याची गणिते चुकली झाली बुध्यांकाची होळी ,
मिटले सारे होते नव्हते एका अनोळख्या वेळी. //धृ //

पायां खालची जमीन हरली ,
डोक्यावरचे  आभाळ ,
खंबीर पनाची भिंत ढळली ,
उरले बिन खोडाचे झाड . // १ //

किंमत इतकी खचून पडली ,
गुणधर्माची नासडी झाली 
कर्तुत्वाच्या झाल्या चिंद्या , 
इज्जतीचा बाजार . // २ //

तपतपत्या रानात पडलो ,
झोके त्यावर लाल ,
प्रतिबिंबाला गाठू बघतो ,
करून एकसारखे वार// ३ //

जगात नखरे लाखो आले ,
लाखोसाठी लाखो झाले ,
लहानांसाठी मोठे झाले ,
मोठ्यांसाठी  त्याहून मोठे,
मला नशिबी चुकून गुन्तिले ,
सुबाबळीचे  काटे // ४ //

सूर्याशी ना गाठ पडो एवढे एक उपकार ,
अमावास्येला विनंती राही ठेव कृपा अपरंपार ,
 विश्वासाचा घात ना हो ,
पुन्हा एक हा भास ना हो ,
क्षणात सारे विसरून जाईल ,
बाकी तेवेढे सोबत ठेवील ,
काळाची या सोय कर ,
परकाळाची मी करीन .// ५ //

कुठून चुकली बेरीज माझी ,
कुठून चुकली वजा ,
आयुष्याची गणिते चुकली झाली बुध्यांकाची होळी ,
मिटले सारे होते नव्हते एका अनोळख्या वेळी. //धृ //

3 comments:

  1. ekdum badiya use of alankar. pratyekach manus jate ashya vicharantun. Good job!

    ReplyDelete
  2. if you consider a number system zero is the reference, similarly keeping this poem as reference create new ones, simply awesome

    ReplyDelete
  3. thaks for your appriciation , buddy next one is comming soon. . . .

    ReplyDelete