कटाक्षा च्या यादी मधली फुले वेचली चार ,
वीज आखली डोळ्यांमधुनी नारंगी लाल ,
शोध चालला रोज रोजचा वेग वेगळे सार ,
शद्ब मंजूषा चुकते जाणून समजावण्याचा लाळ .
एकीकरण हे रोज व्हायचे कधी दवांचे कधी धुकांचे ,
क्षणा क्षणाला येते ग्लानी स्वप्न पहाया एकांताचे ,
बोल बोलता तंत्रीकीचे कवी वाटते नि कविता ,
वर्ग तारिका विसरून जाई सम्मेलन पावता ,
लेक गोरटी पाहून तुजला विषय वाटते एक ,
जरी चालते संदर्भाला स्पष्टीकार्नाचे लेख ,
त्या यादीवर बोट चालता आठवते ती खळी ,
फुल फुलांना मलावाणारी द्राक्षाची ती मळी .
सांग तुझा हा विषय कसला ? मिटोनी डोळे भिरभिरतो ,
हळूच अचानक कातरवेळी उद्गारी दर्शवितो .
KHOKE SAHEB, EK NUMBER.
ReplyDeletePRATYEKACHYA KATAKSHACHYA YADINI HICH AWASTHA ASEL.
GOOD KEEP IT UP.