Friday, 17 July 2015

कटाक्षाची यादी

कटाक्षा च्या यादी मधली फुले वेचली चार ,
वीज आखली डोळ्यांमधुनी नारंगी  लाल ,
शोध चालला रोज रोजचा वेग वेगळे सार ,
शद्ब मंजूषा चुकते जाणून समजावण्याचा लाळ . 

एकीकरण हे रोज व्हायचे कधी दवांचे कधी धुकांचे ,
क्षणा क्षणाला येते ग्लानी स्वप्न पहाया एकांताचे ,
बोल बोलता तंत्रीकीचे कवी वाटते नि कविता ,
वर्ग तारिका विसरून जाई सम्मेलन पावता ,
लेक गोरटी पाहून तुजला विषय वाटते एक ,
जरी चालते संदर्भाला स्पष्टीकार्नाचे लेख ,
त्या यादीवर बोट चालता आठवते  ती खळी ,
फुल फुलांना मलावाणारी द्राक्षाची ती मळी . 


सांग  तुझा हा विषय कसला ? मिटोनी डोळे भिरभिरतो ,
हळूच अचानक कातरवेळी उद्गारी दर्शवितो . 

1 comment:

  1. KHOKE SAHEB, EK NUMBER.
    PRATYEKACHYA KATAKSHACHYA YADINI HICH AWASTHA ASEL.
    GOOD KEEP IT UP.

    ReplyDelete