Friday, 17 July 2015

कटाक्षाची यादी

कटाक्षा च्या यादी मधली फुले वेचली चार ,
वीज आखली डोळ्यांमधुनी नारंगी  लाल ,
शोध चालला रोज रोजचा वेग वेगळे सार ,
शद्ब मंजूषा चुकते जाणून समजावण्याचा लाळ . 

एकीकरण हे रोज व्हायचे कधी दवांचे कधी धुकांचे ,
क्षणा क्षणाला येते ग्लानी स्वप्न पहाया एकांताचे ,
बोल बोलता तंत्रीकीचे कवी वाटते नि कविता ,
वर्ग तारिका विसरून जाई सम्मेलन पावता ,
लेक गोरटी पाहून तुजला विषय वाटते एक ,
जरी चालते संदर्भाला स्पष्टीकार्नाचे लेख ,
त्या यादीवर बोट चालता आठवते  ती खळी ,
फुल फुलांना मलावाणारी द्राक्षाची ती मळी . 


सांग  तुझा हा विषय कसला ? मिटोनी डोळे भिरभिरतो ,
हळूच अचानक कातरवेळी उद्गारी दर्शवितो . 

गुलाबी कळी

एक गुलाबी कळी उमलली ,
तिला न जाने राखण कोण ,
भून्गुर येती जाती वेळी ,
तिला न जाने मळवेल  कोण .

 ओठ  कसले पाखळीच ती ,
नाजूक आहे देखणीच ती ,
गोडगुलाबी जोडी असली ,
तिला न जाने तोडील कोण . 

डोळे कसले सम्मोहन ते ,
सुर्माची त्यास सजवण का ?
मोठी  टपोर  काळे भोर ते ,
काजळाची त्यास सजवण का ?


विरह

काळजाच्या जखमांना रक्तस्त्राव होतो का ?
गुप्त पडल्या घावांना वेदनाच नाही का ?

आज दुखवटा करतो आहे,
आपल्यात मी रडतो आहे ,
अश्रु पण का आटलेत  रे ,
दोन नेमके मोती  झाले .


कोमेजून हे हृदय अचानक आठवणीत  तो  जातो आहे ,
मिन मिनलेल्या  तारकत तो  रंगोटी शोधत आहे. 

कळतच नाही असले नाते , नाव ठेवुनी दमलो आहे ,
काल काय ते , आज कोणते शब्द हे आता संपत आहे. 

काप्प्यावरच्या  आपुल्या गप्पा शहारांनी मी मोजत आहे ,
आनंदाच्या घरातल्याला , हृदय नेमके दुखवत आहे . 

उकलत नाही  गुपित हे  आता , रागही आहे प्रेम  ही आहे,
स्पष्टीकरण मी करू कशाचे, मन हे माझे चंचल आहे . 

पापण्याला पण प्रश्नच आहे , शत्रू  म्हणू कि कुत्रा ,
निजल्या देही स्वप्न दाखवी दोघांमध्ये ना  तिसरा . 

Friday, 26 June 2015

भावना

ऐकवतो ना तूला त्या शब्दांचिया गोष्ट ,
सरळ सरळ लागत नाही लावाण्यासाठी कष्ट ,
मनामध्ये येतात  ग तुटक तुटक अस्पष्ट ,
जोडून बघत असतो तरी अर्थ काढून स्पष्ट . 

एक एक वाक्य जोडून आता बनते आहे गद्य ,
भावना नाही त्यात म्हणे लिहितो आहे पद्य ,

अर्थ आता कवितेचा जुळत नव्हता कडव्यात ,
पहिल्यात होतो , दुसऱ्यात आहे ,
सोबत राहील म्हणून जमत नव्हता तिसऱ्यात . 

सोडून सगळ आता करतो आहे चारोळी ,
पहिली जमते , दुसरी जमते , तिसरीत होते रांगोळी . 

करतो आता नवीन नवीन लिहिण्याच्या वारी ,
बनत चालल्या आता कागदाच्या गोळ्यांच्या माळी ,
हलक्या हाती लिहितो तरी निफ चालली वाकून ,
निजल्या देही म्हणे स्वरांनी कविता म्हणतो रापून …… 


Friday, 17 April 2015

लाल गुलाब

देख्न आहे मुन्नार ,सऱ्यांचे घेऊन आधार ,
डोंगराला सजवणारे , धुक्याचे ते ते हार . 

flower garden म्हणजे फुलांचा बाझार ,
पहिल्यांदा छेडलेले गुलाबाचे झाड . 

निसर्गाला समजणार्यांना नियमच फार ,
तरी हो म्हटलीस तू घेऊन नाट्ट्याचा आधार . 

लहानच का ग ? आपलं हे पात्र ,
स्पष्टीकरण नाही केवळ संधर्भाच मात्र . 

शेवटच केला आणि सुरुआतच दिली ,
मधातली story आपली राहूनच गेली . 

नट नट्या बनणे फक्त पटापुरता काळ ,
असाच सुरु होतो एक छोटासा संसार . 

मोठ मोठ्या कथांना एक छोटीसी सुरुआत असते ,
समजल्या तर भावना नाहीतर dialogue असते . 
or 
समजलं तर प्रेम नाहीतर खूप मोटा game असते .