Friday, 16 March 2012

kavitechya shevati



काय हा पाउस थेंब थेंब सुरु
मनातील वाचा हळू हळू चालू

रात्रीचा हा अंधार चंद्र हि गोलाकार
चांदण्यांचा जणू आठवडी बाजार

धून वाऱ्याची ऐकत काजव्यांचा आवाज
मनातल्या ठोक्यासोबत मोजद्यांची साथ

थोड्या वेळ बघून रात्रीचे हे नगरे
उठून उभे राही अंगावर भीतीचे शहारे

भीती लागते मला आता सांगू तरी कुणाला
उरली माझ्या सोबत फक्त माझीचरे छाया  


मन घट्ट  करून पुढे मी निघालो
संगे संगे भुताच्या घासाला मी गेलो

पुढे पुढे जाऊन एका कडेला अडलो
वाडाच्या त्या झाडाला मी  चकित पहालो

मना मध्ये विचार माझे जोराने चालले
जणू पावसाचे थेंब चोरीने मारले

ऐवाध्या मोठ्या झाडाखाली एकटाच  का
सागरात पोहणारा एकटाच का


विहिरीतल्या बेडकाला जग फार छोटे 

वाडाच्या त्या झाडाचे राज्य फार मोठे

वेळ असा निघत जाऊन चंद्र हि निघाला
संगे संगे चांदण्याचा बाजार संपला

मोजद्यांच्या  वाज्यासोबत वारा हि थांबला
पावसाच्या थेम्बासोबत अंधार चालला 


कळले नाही वेळ कसा भीतीत निघाला 
डोंगारा आड सोबतीला सूर्य हि रे आला 


सकाळ झाली म्हणून डोळे चोळून पहाले
साखर झोपेत आलेले स्वप्न  हे ते वेडे
साखर झोपेत आलेले स्वप्न  हे ते वेडे




2 comments:

  1. kya bat, aata kuth tar sahebanchi creativity baher yeun rahili. prayatna suru theva.

    ReplyDelete
  2. Khar tar ya kavite pasunch lihine suru kele aahe re me mhanun tutki putki ka hoina pan hrudaya jawalchi aahe. . . . .

    ReplyDelete