Friday, 17 July 2015

कटाक्षाची यादी

कटाक्षा च्या यादी मधली फुले वेचली चार ,
वीज आखली डोळ्यांमधुनी नारंगी  लाल ,
शोध चालला रोज रोजचा वेग वेगळे सार ,
शद्ब मंजूषा चुकते जाणून समजावण्याचा लाळ . 

एकीकरण हे रोज व्हायचे कधी दवांचे कधी धुकांचे ,
क्षणा क्षणाला येते ग्लानी स्वप्न पहाया एकांताचे ,
बोल बोलता तंत्रीकीचे कवी वाटते नि कविता ,
वर्ग तारिका विसरून जाई सम्मेलन पावता ,
लेक गोरटी पाहून तुजला विषय वाटते एक ,
जरी चालते संदर्भाला स्पष्टीकार्नाचे लेख ,
त्या यादीवर बोट चालता आठवते  ती खळी ,
फुल फुलांना मलावाणारी द्राक्षाची ती मळी . 


सांग  तुझा हा विषय कसला ? मिटोनी डोळे भिरभिरतो ,
हळूच अचानक कातरवेळी उद्गारी दर्शवितो . 

गुलाबी कळी

एक गुलाबी कळी उमलली ,
तिला न जाने राखण कोण ,
भून्गुर येती जाती वेळी ,
तिला न जाने मळवेल  कोण .

 ओठ  कसले पाखळीच ती ,
नाजूक आहे देखणीच ती ,
गोडगुलाबी जोडी असली ,
तिला न जाने तोडील कोण . 

डोळे कसले सम्मोहन ते ,
सुर्माची त्यास सजवण का ?
मोठी  टपोर  काळे भोर ते ,
काजळाची त्यास सजवण का ?


विरह

काळजाच्या जखमांना रक्तस्त्राव होतो का ?
गुप्त पडल्या घावांना वेदनाच नाही का ?

आज दुखवटा करतो आहे,
आपल्यात मी रडतो आहे ,
अश्रु पण का आटलेत  रे ,
दोन नेमके मोती  झाले .


कोमेजून हे हृदय अचानक आठवणीत  तो  जातो आहे ,
मिन मिनलेल्या  तारकत तो  रंगोटी शोधत आहे. 

कळतच नाही असले नाते , नाव ठेवुनी दमलो आहे ,
काल काय ते , आज कोणते शब्द हे आता संपत आहे. 

काप्प्यावरच्या  आपुल्या गप्पा शहारांनी मी मोजत आहे ,
आनंदाच्या घरातल्याला , हृदय नेमके दुखवत आहे . 

उकलत नाही  गुपित हे  आता , रागही आहे प्रेम  ही आहे,
स्पष्टीकरण मी करू कशाचे, मन हे माझे चंचल आहे . 

पापण्याला पण प्रश्नच आहे , शत्रू  म्हणू कि कुत्रा ,
निजल्या देही स्वप्न दाखवी दोघांमध्ये ना  तिसरा .