शब्द थोडे खुंटलेले , अर्थ थोड्या भावना ,
जिवजळतो अर्धमेला ,त्यात जीवन पावला /
प्रिय विनतो जाऊ देतो ,देतो होकारी स्वतः ,
हृदय त्याचे बांधू पाही जीवनाची नवं दिशा /
आज स्वप्न पावसाचे , थेम्बरुप हि आठवण ,
मैत्रीचे जे कालवण ,अनं समुद्राची साठवण //
बोलतो हा वेळ आता, अंत पाही सर्वसा,
काळ मागे लोटतो, परी थांबू बघतो मर्म हा //
कापसाचे व्यर्थ जळणे ,देह तेलातून निघून ,
पणती खाली साठलेले, मर्म मनातले अडून //
शब्द कंठी दबलेला ,दाटलेल्या पापण्या ,
भान तोडी पाखळ्या ,अनं पाय चाली कापरा//
पाषाण जाव पडते जळात ,चेताऊन पाही प्रत्येक वाट ,
घोर किरकाली ऐकून आज , सोडू पाही हृदयही साथ //
मावळले मज दिवस सारे ,खुलावल्या साऱ्या रात्र ,
दरीत सारे हुडकून पाही ,आशेचे हे वेडे पात्र //
कळून सारे हळवे होते ,दिसून पाती लाल ,
घडून मन हे जळून उठते ,उरते राखड चार //
चुकून गेली वळणे सारी ,चुकून गेले एक निशाण ,
मिटून गेल्या दहा दिशा अन मिटून गेले हर एक रान //