Tuesday, 12 July 2011

आश्रित

पहाटेची वेळ होती नदी काठची वाट होती ,
सूर्याच्या झेपेसंगे सावली अकात होती ,
पाखरे घरट्यात  नव्हती गोठ्यात नव्हत्या गाई ,
साखर झोपेत मी होतो आणि बाहेर पाणी घेऊन आई.

झोप  मोडली कंबर तुटली बाहेराची  उन नाहीरे मला झेपली ,
कशापाई स्वप्नाच लालच तू दिल,
डोंगरावरचा सूर्य बघायचं उगाच राहून गेलं ,

थोडी तरी देरे बुद्धी काही तरी करू ,
आज नाही उद्या नाही परवा तरी करू,

भुताचा विचार करून भविष्याचा पण करून टाकला ,
वर्तमान सारा विचारातच गमावला.
  
काय करू कस करू सांगेल तरी कुणी ,
भविष्य हे भोक  आहे आणि त्या भोकात नाहीरे आम्ही.

टपरी लाऊ टुपरी लाऊ काही तरी विकुरे ,
भविष्यात कधीतरी काहीतरी करूरे ,

कधीतरी काहीतरी कधीचच रहाल ,
आपल्या जीवनात राज्या  काहीच नाही रहाल  .

2 comments:

  1. kavitechya shevti purna viram changla ka alp viram kivva udgarvachak chinna? Thoda vichar kar? karan kavita pan kontya kavita sangrahatli rahate. barobar?

    ReplyDelete
  2. baki lihil ekdum mast, pan title aashrit ka?

    ReplyDelete