Thursday, 15 November 2012

उगवत्या सूर्याची सुंदर वाट

जुन्या घराची जुनी चौकट ,
पांढर्या घराची हिरवी रौनक ,
कवेलुच्या घराला लहानसा गौरव ,
त्याला सावरती माझी आजी .
 
स्वयंपाक घराच्या ओंजलीची सुरवात,
 शेन सारावनाच्या उभ्या सुखात,
पांढर्या चुन्याची कोरती लाट,
उगवत्या सूर्याची ती सुंदर वाट .

स्वभोवतालच्या रानात ते सुंदर गाण ,
कमळाच्या पानावर उदका सारखा छान ,
घरासमोर असलेली तीन मजला पाढरी कुंडी ,
त्यामध्ये डुलणारी लक्ष्मिचि तुळशी .

डाव्याबाजूचे उमराचे झाड ,
त्या सोबत असलेले कांता काकुंचे कुंपण ,
दुसर्या दरवाज्याच्या बाजूला असलेली ,
अर्धी जमिनीत दुबकलेली पांढरी नांद ,
आणि त्यात पाणी भरतांना माझी आजी.

नेहमी कुरकुर करणाऱ्या चांदुरकर काकू ,
नेहमी धाक दाखविणाऱ्या पण खेळायला देणाऱ्या  ,
खायला गुळाचे लाडू आणि उगाच एकामध्ये हिंग टाकणाऱ्या  ,
कोपर्यात लावलेली सहा विटांची चूल ,
वांगी भाजणारी माझी आजी .

समोरच्या खोलीचा वरांडा ,
देई सर्वाना सुखवडा ,
मधल्या  खोलीत  बांधलेला आणि पिढ्या न पिढ्या झोका देणारा पाळणा ,
झोका देणारी माझी आजी ,
चार रुपयां पेक्षा चार वर्गाला महत्व देणारी ,
आज पेक्षा उद्याचा आणि ,
उद्या पेक्षा पर्वाचा विचार करणारी माझी आजी . . . . . . . .

Sunday, 11 November 2012

आयुष्याची गणिते

कुठून चुकली बेरीज माझी ,
कुठून चुकली वजा ,
आयुष्याची गणिते चुकली झाली बुध्यांकाची होळी ,
मिटले सारे होते नव्हते एका अनोळख्या वेळी. //धृ //

पायां खालची जमीन हरली ,
डोक्यावरचे  आभाळ ,
खंबीर पनाची भिंत ढळली ,
उरले बिन खोडाचे झाड . // १ //

किंमत इतकी खचून पडली ,
गुणधर्माची नासडी झाली 
कर्तुत्वाच्या झाल्या चिंद्या , 
इज्जतीचा बाजार . // २ //

तपतपत्या रानात पडलो ,
झोके त्यावर लाल ,
प्रतिबिंबाला गाठू बघतो ,
करून एकसारखे वार// ३ //

जगात नखरे लाखो आले ,
लाखोसाठी लाखो झाले ,
लहानांसाठी मोठे झाले ,
मोठ्यांसाठी  त्याहून मोठे,
मला नशिबी चुकून गुन्तिले ,
सुबाबळीचे  काटे // ४ //

सूर्याशी ना गाठ पडो एवढे एक उपकार ,
अमावास्येला विनंती राही ठेव कृपा अपरंपार ,
 विश्वासाचा घात ना हो ,
पुन्हा एक हा भास ना हो ,
क्षणात सारे विसरून जाईल ,
बाकी तेवेढे सोबत ठेवील ,
काळाची या सोय कर ,
परकाळाची मी करीन .// ५ //

कुठून चुकली बेरीज माझी ,
कुठून चुकली वजा ,
आयुष्याची गणिते चुकली झाली बुध्यांकाची होळी ,
मिटले सारे होते नव्हते एका अनोळख्या वेळी. //धृ //