Saturday, 10 March 2012

आठवणीचे पान

वहीच ते मागचं पान,
 दिसायचे फारच घान  // धृ //

सुरवातीच्या रेखांमध्ये ,
मोत्यांच्या माली छान .
एका मागून एक लागती,
 वेलांटी आणि स्वल्पविराम . 

अक्षरा वरती पक्ष निघायचा
वरचा आणि खालचा कक्ष निघायचा .
अर्थ जितका मोठा निधते ओळी तितक्या छोट्या,
संदर्भा सहित स्पष्टीकरणाला शाळेला दोन बुट्ट्या .
सुट्ट्यांमध्ये वही निघायची 
मुरमुरे फुटणे त्यातच खायची .
वाचले त्यात आता दोनच पान,
 होते जे फारच घान .
एक एक शब्द पानावरचा ,
लाल निळ्या काळ्या शाईचा.
तुटके गणिते करून चार ,
बेरीज वजा भागाकार .

कुंडी सोबत झाडे निघती ,
फुले त्यांच्यावर लिलीचे .
पेन थकता चालवून सांप ,
निळ्या काळ्या शाईचे.
  
मधोमधी होती बाई ,
त्यांच्यामध्ये नेहमीच घाई.
शब्दार्थाच्या वेलीला कवितेची चाल ,
काळूनिम्बाच्या काळीने आमची हाते लाल .

सायंकाळी काय करू ,
नाव गाव प्राणी खेळू .
बाबा विचारे पकडून कान ,
भावना नेहा पंकज सांग .

असले पान घाण काय ,
आठवणींचे ती एकच साय , आठवणींचे ती एकच   साय........





5 comments:

  1. Ekach no bhai
    aathvaniche hey pan
    visarle hotey amhi bebhan
    thnx for aathvan
    to, suputra of Mr. Shravan

    ReplyDelete
  2. supersplendid, mhanje so proud of you surya.

    tya vahitalya kahi goshti tar mi pan visrun gelo hoto.

    ReplyDelete
  3. Tya shewatchya don pananech pushkalshya goshti mala aathaun dilya . thax

    ReplyDelete
  4. खोके .....तुला आठवतंय ही कविता तू ऐकवल्यावर आपण जवळ जवळ दोन ते तीन तास शाळेचे दिवस नि शेवटचे घाण पान यावर बोललो होतो ........हो न .......... जेवड्याही कविता तू लिहून मला ऐकवल्यास त्यातली सर्वात आवडती कविता आहे ही माझी ..........गावच्या शाळेचे दिवस आठवण करून देणारी ......... ते आनंदाचे दिवस ..............आणि खरच शेवटच्या त्या घाण पानात खूप आठवणी आहेत रुजलेल्या ......ज्या आठवल्या नंतर खूप बर वाटत.......खास करून ते व्यंगचित्र ........सरांचे,मुलींचे आणि ..........हा हा !!!
    हया कविते बद्दल माझ्या कडे काही शब्दच नाही आहेत बोलायला तुझ्यासाठी ........खरच !!!

    ReplyDelete
  5. tya shalechya diwasanchi tar gammatch vegali asate , aani ho shabdanchi uladhal shikalas re tu. gdjb

    ReplyDelete