Friday, 16 March 2012

kavitechya shevati



काय हा पाउस थेंब थेंब सुरु
मनातील वाचा हळू हळू चालू

रात्रीचा हा अंधार चंद्र हि गोलाकार
चांदण्यांचा जणू आठवडी बाजार

धून वाऱ्याची ऐकत काजव्यांचा आवाज
मनातल्या ठोक्यासोबत मोजद्यांची साथ

थोड्या वेळ बघून रात्रीचे हे नगरे
उठून उभे राही अंगावर भीतीचे शहारे

भीती लागते मला आता सांगू तरी कुणाला
उरली माझ्या सोबत फक्त माझीचरे छाया  


मन घट्ट  करून पुढे मी निघालो
संगे संगे भुताच्या घासाला मी गेलो

पुढे पुढे जाऊन एका कडेला अडलो
वाडाच्या त्या झाडाला मी  चकित पहालो

मना मध्ये विचार माझे जोराने चालले
जणू पावसाचे थेंब चोरीने मारले

ऐवाध्या मोठ्या झाडाखाली एकटाच  का
सागरात पोहणारा एकटाच का


विहिरीतल्या बेडकाला जग फार छोटे 

वाडाच्या त्या झाडाचे राज्य फार मोठे

वेळ असा निघत जाऊन चंद्र हि निघाला
संगे संगे चांदण्याचा बाजार संपला

मोजद्यांच्या  वाज्यासोबत वारा हि थांबला
पावसाच्या थेम्बासोबत अंधार चालला 


कळले नाही वेळ कसा भीतीत निघाला 
डोंगारा आड सोबतीला सूर्य हि रे आला 


सकाळ झाली म्हणून डोळे चोळून पहाले
साखर झोपेत आलेले स्वप्न  हे ते वेडे
साखर झोपेत आलेले स्वप्न  हे ते वेडे




Saturday, 10 March 2012

आठवणीचे पान

वहीच ते मागचं पान,
 दिसायचे फारच घान  // धृ //

सुरवातीच्या रेखांमध्ये ,
मोत्यांच्या माली छान .
एका मागून एक लागती,
 वेलांटी आणि स्वल्पविराम . 

अक्षरा वरती पक्ष निघायचा
वरचा आणि खालचा कक्ष निघायचा .
अर्थ जितका मोठा निधते ओळी तितक्या छोट्या,
संदर्भा सहित स्पष्टीकरणाला शाळेला दोन बुट्ट्या .
सुट्ट्यांमध्ये वही निघायची 
मुरमुरे फुटणे त्यातच खायची .
वाचले त्यात आता दोनच पान,
 होते जे फारच घान .
एक एक शब्द पानावरचा ,
लाल निळ्या काळ्या शाईचा.
तुटके गणिते करून चार ,
बेरीज वजा भागाकार .

कुंडी सोबत झाडे निघती ,
फुले त्यांच्यावर लिलीचे .
पेन थकता चालवून सांप ,
निळ्या काळ्या शाईचे.
  
मधोमधी होती बाई ,
त्यांच्यामध्ये नेहमीच घाई.
शब्दार्थाच्या वेलीला कवितेची चाल ,
काळूनिम्बाच्या काळीने आमची हाते लाल .

सायंकाळी काय करू ,
नाव गाव प्राणी खेळू .
बाबा विचारे पकडून कान ,
भावना नेहा पंकज सांग .

असले पान घाण काय ,
आठवणींचे ती एकच साय , आठवणींचे ती एकच   साय........





Sunday, 4 March 2012

Eakatach me ......?

गेली गावाक्षातुनी दूर जेव्हा ,
क्षणार्धात डोळे शून्यात गेले .
कळले ना गाली उतरले हे केव्हा ,
डोळ्यातले दोन पानगोले  .

छळते मला आत हृदयाची तार ,
घेउनी आठवणींचे हे जाळ.
सलते मला आज त्या तुझ्या शब्दरेखा ,
जणू तीर त्यांचे हे हृदयापार.

दिली हाक जेव्हा दूरच्या दरीतून ,
प्रितीचे हे रान बहरून आले .
मदतीला गेले विचार निराळे ,
जशी डोंगरावर  उगवली समुद्रात मिले .

ऐकाव वाटे तुझे बोल घुंगरू ,
जशे रानात सांप सूलासुलाते .
अशी पहिल्या प्रहरात अवघ्या सकाळी ,
कोवळून कोकिला कुह्कुहते .

थांबता तुझी पाय चाल,
हृदयाची ठोक थांबावते.
जणू मानाआत जात्या किती रक्तानल्या हळूच भीतीने कोमेजते